X
Call Us Today! 8080056056/022-24364242

मा-रुद्रा (MA RUDRA 007 ) लेसरहिमोथेरपि वापरण्याचीपद्धती .

प्रथम नैसर्गिक पद्धतीने निरोगी आयुष्य जगण्याचा निश्चय केल्याबद्दल तुमचे अभिनंदन . स्वतः निरोगी व्हा व इतरांनाही निरोगी होण्यास मदत करा ..मा रुद्रा लेसर हेमोथेरपी ००७ हे लेसर किरणे उत्सर्जित करणारे उपकरण आहे. मागिल बाजूस लेसरचे लाईट एका रांगेत चार,समोरच्या रांगेत दोन तर मध्ये एक अश्या पद्धतीने असतात .आठवा लेसर हा नाकाच्या नळीच्या टोकाला असतो .

मा-रुद्रा लेसर हेमोथेरपी ००७ उपकरण पहिल्यांदा वापरण्या आधी हे उपकरण २ ते ३ तास चार्जिंग करावे .१००% चार्जिंग झाल्यावर ते वापरण्यास सुरुवात करावी .

मा-रुद्रा ००७ लेसर हिमोथेरपि मशीन कसे वापरावे ?

मा-रुद्रा लेसर हेमोथेरपी ००७ उपकरण हे फक्त डाव्या मनगटावर वापरण्याकरिता डिझाईन केलेले आहे . या उपकरणाची मागील बाजू ची रचना अशी आहे कि एका रांगेत असलेली चार लेसरची किरणे हि डाव्या हाताच्या नाडीवर पडतात .

नाडी कशी बघावी ?

उजव्या हाताची दोन बोटे ,डाव्या हाताच्या मनगटावर अंगठ्याच्या बाजूने ठेवली असता नाडीचे ठोके लागतात . सोबतच्या चित्रात बघा. मा-रुद्रा लेसर हेमोथेरपी ००७ उपकरणाच्या मागील बाजूला एका रांगेत असलेली चार लेसरची किरणे हि डाव्या हाताच्या नाडीवर पडतील अश्या बेताने ते मनगटावर बांधावे . या नंतर नाकात घालण्याची लेसरची नळी मनगटावरील उपकरणाला जोडावी . मनगटावरील उपकरणाला आपल्याकडील बाजूस दोन छिद्रे असतात त्यापैकी लहान छिद्रात ती फिट करावी . नाकात घालण्यासाठी जे टोक असते त्याला लेसर चा लाईट असतो .त्यावर सोबत दिलेली कॅप लावावी म्हणजे लेसरचे संरक्षण होते . हि नळी नाकात डाव्या नाकपुडीत २ ते ३ सेंटीमीटर आत ठेवावी . नळी नाकात ठेवण्याआधी नाक साफ करून घ्यावे . आता तुमचे हिमोथेरपि मशीन वापरण्यासाठी तयार आहे . on/off चे बटन एकदा दाबले कि मशीनचा पडदा प्रकाशित होईल .त्यावर वेळ ,पावर , व इतर बाबी दिसतात . on/off चे बटन पुन्हा दाबल्यावर मशीन मधून लाल रंगाच्या लेसर किरण शलाका बाहेर पडू लागतात . महत्वाचे लेसर किरणे डोळ्यांना अपायकारक असतात त्यामुळे लेसर किरणे थेट डोळ्यात जाणार नाहीत याची काळजी घ्यावी .

किती वेळ उपचार घ्यावा ?

एका वेळी ३० मिनिटे उपचार घ्यावेत . time चे बटन हे वेळ निश्चित करण्यासाठी दाबावे . वेळ पंधरा मिनिटांपासून वाढवता येते जसे १५ ,३०,४५,६० मिनिटे करता येते . सर्वसाधरण प्रौढांसाठी ३० मिनिटे सेट केलेले असतात . सर्वसाधारणपणे हि ३० मिनिटांची ट्रीटमेंट दिवसातून १ ते ३ वेळा घेत येते . यापेक्षा जास्त वेळा घेऊ नये . आपल्या प्रकृतीचा विचार करून हळू हळू उपचाराची वेळ ४५ ते ६० मिनिटापर्यंत वाढऊ शकतात . सलग १० दिवस ट्रीटमेंट झाल्यावर एक दिवस आराम घ्यावा नंतर पुन्हा १० दिवस घ्यावे अश्या पद्धतीने उपचार चालू ठेवावे .

पावर कशी निवडावी ?

मशीन चालू झाल्यावर power चे बटन दाबून पावर कमी जास्त करता येते . जसे जसे तुम्ही ते बटन दाबत जाल तस तशी पावर वाढत जाईल . मशिनच्या पडद्यावर वरच्या बाजूला उजव्या कोपऱ्यात ते तुम्ही पाहू शकतात . पावर १ ते ४ स्तरापर्यंत वाढवता येते .प्रौढांसाठी ४ स्तरावर पावर ठेवणे फायद्याचे असते .

नाकातील लेसर वापरले नाही तर चालेल का ?

लेसर हिमोथेरपि चा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी मनगटाबरोबर नाकातील रक्त वाहिन्या वरही लेसर हिमोथेरपि घ्यावी . दोन्ही ठिकाणी लेसर वापरल्या मुले तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होईल . नाकातील लेसर वापरण्याआधी नाक साफ करून घ्यावे . शिवाय सोबत दिलेली कॅप लेसर वरती लावावी त्यामुळे लेसरची क्षमता सुरक्षित राहते . वापरून झाल्यावर ते कोरड्या फडक्याने पुसून घ्यावे .

लेसरहिमोथेरपि मशीन जास्त वेळ वापरले तर मी लवकर रोगमुक्त होईल का?

संशोधनाने सिद्ध झालेल्या व आम्ही सुचवलेली वेळ व पावर यांचाच वापर करणे तुमच्या फायद्याचे आहे . मंद लेसर पासून मिळणारी उर्जा जास्त प्रमाणात दिल्यास त्याचा अनुकूल परिणामच होईल असे नाही किंबहुना जास्त प्रमाणात उर्जा दिल्यास मानवी पेशी त्या उर्जेला कमी प्रतिसाद देतात हे संशोधनातून लक्षात आले आहे म्ह नुनच आम्ही सुचवलेल्या प्रमाणातच त्याचा वपार करावा .लक्षात ठेवा हिमिथेरपि हि रोज केली जाणारी नियमित प्रक्रिया आहे . मराठीत म्हण आहे "पी हळद अन हो गोरी " असे होत नाही .

ट्रीटमेंट घेताना काय काळजी घ्यावी ?

ट्रीटमेंट घेताना तुम्हाला तुमच्या दैनंदिन कामात बदल करण्याची गरज नाही ,तुम्ही बसून अथवा झोपूनहि ट्रीटमेंट घेऊ शकतात . झोपून ट्रीटमेंट घेणे केवाही चांगलेच असते कारण झोपलेल्या अवस्थेत आपले पूर्ण शरीर शिथिल होते व तुम्ही छान पावर न्याप घेऊ शकतात . कृपया लेसर लाईट थेट डोळ्यात येणार नाही याची काळजी घ्या . सांगितल्या प्रमाणे आधी नाकातील लेसर लाऊन घ्या व मगच मशीन चालू करा . तसेच नाकातील नळी चे टोक साफ करण्यासाठी स्पिरीटचा वापर करू नका ,साध्या टिशू पेपर ने ते साफ करा

ट्रीटमेंट चालू आणखी कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे ?

तुमचे दैनंदिन कामकाज ,आहार ,व्यायाम व औषधे यात कुठलाही बदल करू नये . जर तुम्हाला डायबेटीस ,उच्च रक्त दाब ,हृदयविकार ,अर्धांगवायू यासारखे आजार असतील तर आहार विहाराची पथ्ये पाळणे फार महत्वाचे आहे . किंबहुना आहाराच्या चांगल्या सवई तसेच नियमित व्यायाम तुम्हाला लवकर रोगमुक्त होण्यासाठी मदतच करेल व ते तुमच्यासाठी आवश्यकच आहे . लक्षात ठेवा लेसर हिमोथेरपी मशीन प्रत्येक वेळी तुमचे रक्त शुद्धीकरण करत असते व ती एक नियमित पण हळुवार प्रक्रिया असते . कोणते फायदे कधी दिसतात याची माहिती इतरत्र दिली आहे . चार्जिंग चालू असताना मशीन वापरू नये . लहान मुलांपासून दूर ठेवा

ट्रीट मेंट घेतांना मला काही त्रास जाणवेल का ?

हि अत्यंत सुरक्षित व कुठलेही सा इड इफेक्ट नसलेली उपचार पद्धती आहे . कुठल्याही प्रकारची वेदना ,चटका, टोचणी जाणवत नाही . फक्त उघड्या डोळ्यांनी थेट लेसर किरणे बघू नका ,त्यमुळे डोळ्याला इजा होऊ शकते . सुरुवातीच्या काही दिवसात घश्याला कोरड पडणे ,मंद डोके दुखणे हे प्रकार होऊ शकतात आणि ते रक्त प्रवाहात सुधारणा झाल्यामुळे होते . तुम्हाला जास्त डिसकम्फोर्ट वाटल्यास मशीन ची पावर व उपचाराची वेळ कमी करावी . किवा दोन दिवस नंतर परत चालू करावी

मशीन चार्ज कसे करावे ?

मशीन मध्ये लिथियम ब्याटरी असते . जेव्हा चार्जिंग कमी होते तेव्हा मशीन टिक टिक असा आवाज करते ,त्यावेळी मशीनला चार्जिंग करावे . आपला मोबाईल फोन जसा चार्ज करतो तसेच चार्जिंग करावे . २/३ तास चार्जिंग करावे . computer u s b port ला हि जीडून चार्जिंग होऊ शकते . चार्जिंग चालू असताना मशीन वापरू नये .

लेसर हिमोथेरपि घेत असताना डॉक्टर नी दिलेली औषधे बंद करावीत का ?

जर तुम्हाला डायबेटीस ,ब्लड प्रेशर ,हृदयविकार वगैरेसाठी डॉक्टरनी औषधे चालू केली असतील तर ती एकदम बंद करू नयेत . लेसर हिमोथेरपि च्या नियमित उपचारांनी नवीनच सुरुवात झालेल्या डायबेटीस ,ब्लड प्रेशर सारख्या आजारांमध्ये परिस्थिती लवकर नॉर्मल होते . त्यामुळे बरेच रुग्ण स्वतःच्या मनाने औषधांचे डोस कमी करतात . मात्र आम्ही या सर्व रुग्णांना त्यांच्या डॉक्टरचा सल्ला घेऊनच औषधांचे प्रमाण कमी करण्याचा सल्ला देतो . तुम्ही ब्लड प्रेशर व शुगर नियमित पणे तपासून त्याची नोंद ठेवा ज्याचा तुमच्या डॉक्टरना औषधांचे प्रमाण कमी करण्यासाठी उपयोग होईल . लक्षात ठेवा लेसर हिमोथेरपि हि डॉक्टरांच्या देखरेखीला पर्याय नसून पूरक आहे .